News & Events Image News & Events Image

News & Events of Akola Urban Co-op. Bank Ltd. Akola

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार यांचे सहयोगाने आयोजित ग्राहक मेळावा व उद्योजकता कार्यशाळा चे उदघाटन सोहळ्यातील क्षणचित्रे. कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी भारत मातेचे पूजन व दिप प्रज्वलन करताना उद्घाटक मा. डॉ. श्री. रामदासजी आंबटकर, विधान परिषद सदस्य, मा. श्री. प्र. म. पार्लेवार संचालक सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, बँकेचे अध्यक्ष मा. श्री. रामेश्वरजी फुंडकर, उपाध्यक्ष श्री. शंतनुजी जोशी, मु. का. अ. मा. श्री. राजनजी सोनटक्के व इतर मान्यवर.

सहकार क्षेत्रात छोट्या बँकांना सामावून घेण्याची ताकद - सतीश मराठे (संचालक,केंद्रीय बोर्ड , रिझर्व बँक ऑफ इंडिया)
नागरी बँकेच्या अनेक भागधारक,खातेधारक,ग्राहकांचे पैसे सुरक्षित

सहकार क्षेत्रात छोट्या बँकांना सामावून घेण्याची ताकद - सतीश मराठे (संचालक,केंद्रीय बोर्ड , रिझर्व बँक ऑफ इंडिया) 0 नागरी बँकेच्या अनेक भागधारक,खातेधारक,ग्राहकांचे पैसे सुरक्षित अकोला- इंदोर येथील सहकार क्षेत्रात नावाजलेली व 50 वर्ष जुनी नागरिक सहकारी बँक'दि अकोला अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.अकोला" मध्ये विलीन झाली आहे. नागरिक सहकारी बँकेच्या सुभाष मार्ग, मल्हारगंज, संयोगीतागंज, एचआयजी कॉलनी या चार शाखा आहेत. दि.25.जुलै रोजी सुभाष मार्ग शाखेत श्री.गणेशाचे विधिवत पूजन करून अद्यावत नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभ कार्यक्रमास मंचावर अध्यक्ष म्हणून सहकार क्षेत्रातील मान्यवर ज्योतींद्र मेहता अध्यक्ष, NAFCUB दिल्ली हे होते. तसेच प्रमुख अतिथि प्रकाश शास्त्री रा. स्व. संघाचे मालवा प्रांत संघचालक तसेच सतीश मराठे, संचालक रिझर्व बँक ऑफ इंडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. शुभारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर यांनी केले व बँकेच्या इंदोर वाटचाली बद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि सतीश मराठे यांनी विचार व्यक्त करताना मोठ्या सहकारी बँकांमध्ये छोट्या बँकांना सामावून घेण्याची ताकद आहे हे आजच्या विलीनीकरणा मुळे समाजात सिद्ध झाले आहे. नागरिक सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत हा विश्वास बँकेच्या ग्राहंकांमध्ये अकोला अर्बन बँके मुळे वृद्धिंगत झाला आहे त्यामुळे आम्हाला खाजगी बँका कडे जाण्याची गरज नाही ही आजची मोठी उपलब्धी आहे असे गौरवोदगार मराठे यांनी काढले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि प्रकाश शास्त्री यांनी आपल्या भाषणात अनेक सहकारी बँकांना शासनाची मदत मिळत असते,पण अकोला अर्बन बँक शासनाच्या मदतीशिवाय उत्तम कार्य करते आहे हे अभिनंदनास्पद आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योतींद्र मेहता यांनी आपल्या भाषणात अकोला अर्बन बँकेने नागरिक सहकारी बंकेला आपल्या बँकेत विलीन करून घेतल्यामुळे अनेक परिवार सुरक्षित झाल्यामुळे समाधान व्यक्त केले. मध्य प्रदेशातील मुख्य बाजारपेठ असलेल्या इंदोर येथे ही बँक आता दि अकोला अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लि. (मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक) या नावाने ओळखली जाईल. शहरातील प्रतिष्ठित नागरिक या बँकेचे ग्राहक व भागधारक आहेत. या कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनू जोशी व सचिव हरिषभाई लाखानी तसेच बँकेचे संपुर्ण संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के याच्या समवेत बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रतिभा जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजन सोनटक्के यांनी केले. याप्रसंगी बँकेचे सन्माननीय ग्राहक तथा भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Banking Facility