अकोल्यातील ना नफा ना तोटा व सेवा भाव सर्वोत्तम या तत्वावर चालणारे एकमेव धर्मादाय रुग्णालय. अत्याधुनिक सुसज्य मायक्रो-बायोलॉजी पॅथॉलॉजी लॅब.
अकोला जिल्ह्यातील एकमेव खाजगी निदान केंद्र, ज्यात एकूण १७,८५३ रूग्णांच्या विविध प्रकारच्या चाचण्या केल्यात, कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या घरोघरी जाऊन एकंदरीत आर.टी.पी.सी.आर. १४,९७२ चाचण्या करण्यात आल्यात. मायक्रोबायोलॉजी पॅथॉलॉजी लॅबमध्ये खालील प्रकारच्या चाचण्या होत आहेत. 1) कोरोंना 2) एचआयव्ही 3) टीबी 4) कल्चर 5) स्वाईन फ्लु 6) कुष्ठरोग.
अश्या अनेक चाचण्या आहेत की ज्यासाठी अकोला जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई, पुणे, नागपुर या ठिकाणी नमुने पाठवावे लागत होते तसेच रिपोर्ट येण्यासाठी ५ ते ७ दिवसाचा कालावधी लागत असे या सर्व बाबींचा विचार लक्षात घेवुन उपरोक्त चाचण्या आपल्या रुग्णालयात केल्या जात आहेत. कमीत कमी वेळेत रुग्णांना रिपोर्ट मिळत असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील डॉक्टर्सना तातडीने उपचार करणे सोयीचे होत आहे.
अद्ययावत ६ खाटांचे डायलिसीस युनिट. सुसज्ज डिजिटल एक्स रे, सोनोग्राफी, i.breast screening सुविधा उपलब्ध. अकोल्यातील नामांकित बालरोग, चर्म रोग, स्त्री रोग, किडनी रोग, पोट विकार, जनरल तज्ञ यांची सेवा उपलब्ध.
अकोला अर्बन बँक कर्मचारी गणेशोत्सव वर्षं २०२२
कोठारी कॉन्व्हेंट अकोलाच्या विद्यार्थ्यांनी अकोला अर्बन बँकेच्या आदर्श कॉलनी शाखेला भेट दिली असता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. विनोदजी अग्रवाल
अकोला अर्बन बँक ताजनापेठ शाखेत ग्राहक सभा घेण्यात आली. उपस्थित मान्यवर व सन्माननीय ग्राहक
अकोला अर्बन बँक कर्मचारी सेवा समिति, अकोला
अकोला अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यांचे १९९४ पासून आपल्या दरमहा वेतनातील १% रक्कम योगदानाच्या माध्यमातून “जनकल्याण” हा शब्द सार्थ ठरविण्यात सर्व कर्मचाऱ्यांनी सेवेचे एक व्रतच बँकेच्या दैनंदिन कारभारात स्विकारले. १९९४ साली अकोला अर्बन बँक कर्मचारी सेवा समिती स्थापन करून हा सेवा यज्ञ सुरू झाला. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी समितीने रोख रक्कम,रुग्णवाहिका, छात्रालय, वृद्धाश्रमास मदत, २५० कर्मचार्यांिसह ९ पोकलँड, जेसीबीच्या मदतीने मोर्णा नदी स्वच्छता अभियानात सहभाग, टँकर ने खेडोपाडी पाणी पुरवठा, रोगनिदान शिबिरे, नेत्र शस्त्रक्रिया शिबिरे, चष्मे वाटप, भूकंप ग्रस्तांना मदत, अन्नधान्य, कपडे, पांघरून, अशा मदतीत आपला खारीचा वाटा नेहमी उचलला. या करिता एक स्तुत्य अनुकरणीय पायंडा समितीने २८ वर्षापूर्वी घातला.